कथेचे पूर्वविलोकन

2018

CP_CARPE_ICAN2018_Parvati Kanya Vidyalay

पार्वती कन्या विद्यालय

Maharashtra

मार्गदर्शक

वाघमारे सर

विद्यार्थी

वर्ग ८ वी,

Step 1 अनुभवा

वर्गखोल्या आकर्षक आणि अभ्यासपूरक नाहीत अस्वच्छ शालेय मैदान वाया जाणारे अन्न

अनाकर्षक वर्गखोल्या हा मुद्दा आम्हाला जास्त महत्त्वाचा वाटला. कारण रंग उडालेल्या, पुरेशा उजेड नसलेल्या त्या वर्गात अभ्यास करावासा वाटत नाही. प्रसन्न वाटत नसल्याने, अभ्यासावरही त्याचा परिणाम होतो.

आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी

Step 2 Imagine

स्वच्छता करणे आणि आपल्या वर्गाची स्वतः रंगरंगोटी करणे. विविध विषयावर आधारित पोस्टर तयार करून लावणे रंगरंगोटी करण्यासाठी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मदत घेणे. विद्यार्थ्यांच्या मार्फत निधी गोळा करणे आणि त्यातून पैसे जमा करून आवश्यक साहित्य विकत घेणे.

विद्यार्थ्यांनी आपल्या स्तरावर आवश्यक निधी उभारावा, असे ठरले. एक वर्ग रंगवण्यासाठी आवश्यक खर्च काढण्यात आला. विद्यार्थी संख्या लक्षणीय असल्यामुळे तो जमा करणे फारसे अवघड जाणार नाही, असे आम्हास वाटले. रंग दिल्यानंतर तेथे पोस्टर लावण्यासाठी नियोजन तयार करण्यात आले.

Step 3करा

२ वर्गातील विद्यार्थी मिळून हा उपक्रम राबवीत होते, त्यानुसार बजेट काढण्यात आले आणि सर्व विद्यार्थ्यांकडून वर्गणी जमा करण्यात आली. त्यानंतर शनिवारी शाळा अर्धा दिवस असल्यामुळे त्या दिवशी दोन्ही वर्ग रंगवण्याचे ठरवले. रंग दिल्यानंतर तेथे पोस्टर देखील लावण्यात आले. दर महा ते पोस्टर बदलण्याचेही ठरवले गेले. जेणेकरून विविध विषय अभ्यासून माहितीत भर पडेल

स्वच्छ वर्गखोल्या, आकर्षक रंग दिल्यामुळे वर्ग एकदम सुंदर दिसू लागला, सर्व मुलीना आता वर्गात बसल्यावर प्रसन्न वाटते. अभ्यास करण्यासठी एकदम योग्य वातावरण तयार झाले आहे. शिवाय पोस्टर

१००+

आमचा वर्ग आधीसारखा कंटाळवाणा न राहता खूप प्रसन्न झाला आहे. केवळ भिंतीना नवीन रंग आणि रंगीबेरंगी पोस्टर यामुळे वर्गात कमालीचा फरक पडला आहे. तसेच दर महा पोस्टर बदलायचे आहेत, तर त्यासाठी नेहमी नवनवीन माहिती मिळवावी लागेल आणि विद्यार्थी स्वतः ते नवीन लेख तयार करणार आहेत, तर त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात आणि सक्रियतेत देखील खूप सकारात्मक बदल झाला आहे.

दर महिन्याला पोस्टर बदलणे, सुरुवातीला खूप किचकट वाटले. परंतु आम्ही दरमहा एक थीम ठरवली. ज्यानुसार विद्यार्थी स्वतः non academic विषयांवर रिसर्च करून माहितीपर चार्टस बनवतील. त्यांचातील selected 05 – 06 चार्टस क्लासरूममध्ये लावले जातील. (किंवा ६-६ विद्यार्थ्यांच्या गटाला प्रत्येकी १-१ विषय देऊन दरमहा वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळे चार्टस बनवायचे. जेणेकरून विद्यार्थी याची साखळी बनवतील. विविध विषयांवर बनवलेल्या चार्टसचा संग्रह करून ठेवता येईल.) अभ्यासक्रमातील नाही, परंतु ज्ञानात भर टाकणारे विषय - सामान्य ज्ञान, मोठ्या व्यक्तींचे चरित्रे, इतिहासातील प्रेरक, मोटीव्हेटिंग, रंजक कथा, वैज्ञानिक – शोधकथा, त्यांचा जीवनपट, त्यांची विज्ञानेतर शिकवण, कला व साहित्य –जागतिक कीर्तीचे साहित्यिक/कलाकार - त्यांचे लिखाण/जीवनकार्य, इ.

7-15 दिवस

गुणवत्ता शिक्षण

अभ्यास पूरक वातावरणात शिक्षण आपोआप चांगल्या प्रतीचे होते. शिवाय पोस्टर मेला च्या माध्यमातून स्वयं अध्ययनाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल असे आम्हास वाटते.

Step 4 भाग

आमचे दोन्ही वर्ग रंगवून झाल्यावर आम्ही शाळेतील इतर वर्गाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आमच्या वर्गाला भेट देण्यास बोलावले, त्यांना आमच्या वर्गातील बदल बघून विस्मय वाटला. अनेकांनी त्यांच्या वर्गात देखील अशाच प्रकारे वर्गणी जमा करून स्वतःचा वर्ग रंगवण्याचा मानस व्यक्त केला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या मेहनतीचे कौतुक केले.

100 पेक्षा जास्त

वर्गाची नियमित साफसफाई दरमहा बदलले जाणारे पोस्टर - जुने पोस्टर दुसऱ्या वर्गाला डोनेट करण्याचे ठरवले आहे.