कथेचे पूर्वविलोकन

2018

CP_CARPE_ICAN2018_Borgaon Arj

जिल्हा परिषद शाळा, बोरगाव अर्ज, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद

Maharashtra

मार्गदर्शक

बाबुलाल राठोड

विद्यार्थी

वर्ग ४ थी,

Step 1 अनुभवा

विद्यार्थ्यांना सतत बाहेरचे खाण्याची सवय आरोग्यासंदर्भातील तक्रारी

आमच्या शाळेतील विद्यार्थीनी कु. श्रावणी दादाराव बनसोड हीचे चॉकलेट खाण्याने दात खराब होवून तीन चार दिवस दवाखान्यात जावे लागले. सर्वच विद्यार्थी दररोज घरून काही पैसे घेऊन येतात. त्यातून चॉकलेट, चिप्स, बाहेरचे तळलेले पदार्थ विकत घेतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय मुलांना पैसे खर्च करत राहण्याचा सवयही लागून जाईल, त्यामुळे या समस्येवर काम करण्याचे ठरवले.

सर्व विद्यार्थी, तसेच पालकवर्ग

Step 2 Imagine

विद्यार्थ्यांना पैसे खर्च करण्याऐवजी त्यांना बचत करण्याची सवय लागावी म्हणून विद्यार्थी बचत बँक तयार करणे

विद्यार्थ्यांनी प्रभारी मुख्याध्यापक बाबुलाल राठोड व त्यांचे सहकारी आजिनाथ सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ नंदाताई दत्तू ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक मेळाव्याचे आयोजन करून शाळेत विद्यार्थी बचत बॅंक असावी , यावर चर्चा करून विद्यार्थी बॅकेची स्थापना करण्यात आली

Step 3करा

विदयार्थी बचत बॅकचे उद्धाटन माजी उपसरपंच श्री तेजराव काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले . शालेय विद्यार्थी बचत बॅकेचा संपूर्ण कारभार इयत्ता पाचवीचे विदयार्थी कुणाल ठोंबरे (मॅनेजर) व आकाश काळे (कॅशिअर) म्हणून पाहत आहे. आज शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आई ,वडील व नातेवाईकांनी खाऊसाठी दिलेले शाळेतील बॅकेत जमा करतात. शालेय बँकेत पैसे भरणा पावती व पैसे काढण्यासाठी लागणाऱ्या पावत्या मार्फत पैशांची देवाण घेवाण केली जाते . प्रत्येक मुलांना ( खातेदारांना ) महिन्याच्या शेवटी शिल्लक पैशांचा / रुपयांचा हिशोब दिला जातो .

वही , पेन , पेन्सिल व इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी आईवडिलांकडून न मागता बँकेतील पैशांचा वापर करतात. शालेय विद्यार्थी बॅकेमुळे विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष व्यवहारीक ज्ञान , गणितीय ज्ञानात भर पडून प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्याचे कौशल्य विकास होऊन सक्षम भारतीय नागरीक घडावे हाच एक प्रामाणिक प्रयत्न लक्षात घेऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला.

३००+

मुलांना बचतीची सवय लागल्यामुळे सर्व पालक वर्ग आनंदी आहे

--

7-15 दिवस

जबाबदार उपभोग आणि उत्पादन

पैशांचा जबाबदार व्यय करण्याची सवय मुलांना या उपक्रमातून लागेल, असे आम्हास वाटते.

Step 4 भाग

पालक सभा घेऊन हा उपक्रम सर्वांसोबत शेअर करण्यात आला. त्या सर्वांना खूप आनंद झाला. गावकऱ्यांनी देखील या बँकेचे कौतुक केले. सोशल मिडिया च्या माध्यमातून आम्ही तो इतर शाळांसोबत देखील शेअर केला. सर्वांना ही कल्पना खूप आवडली.

100 पेक्षा जास्त

बँकेचे व्यवहार नियमित व्हावे यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभारणे, हे आमचे पुढील उद्दिष्ट आहे.