कथेचे पूर्वविलोकन

2018

कचरा समस्या सोडवणाऱ्या बालवीरांची गोष्ट

जिल्हा परिषद शाळा पांढरीवस्ती ता.चांदवड जिल्हा नाशिक

Maharashtra

मार्गदर्शक

वैशाली सूर्यवंशी

विद्यार्थी

१ रुपेश संजय गांगुर्डे ,

२ कार्तिक शिवाजी निकम ,

३ सार्थक विजय गांगुर्डे,

४ प्रसाद भाऊसाहेब गांगुर्डे,

५ साक्षी सचिन पेंढारी,

६ प्रथमेश सचिन पेंढारी,

७ दिव्या परशराम गांगुर्डे,

८ भाग्यश्री ज्ञानेश्वर गांगुर्डे,

९ दर्शन साहेबराव गांगुर्डे,

१० ओम सागर गांगुर्डे,

Step 1 अनुभवा

१ शाळेपर्यंत यायला व्यवस्थित रस्ता नाही. २ शाळेच्या परिसरात लोक कुठेही कचरा फेकतात . ३ परिसरात कचराकुंड्या नाहीत . ४ परिसरातील लोक शौचालयाचा वापर न करता शाळेमागे शौचास जातात. ५ परिसरातील लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था नाही. ६ शाळेला कंपाउंड नाही. ७ शाळेच्या आवारात पुन्हा पुन्हा कचरा उडून येतो .शालेय परिसर अस्वच्छ होतो . तो कचरा गोळा करण्यात मुलांचा वेळ वाया जातो .

हाती घेतलेली समस्या -- शालेय आवारात आजूबाजूने उडून येणारा कचरा व शाळेमागील आवाराचा होणारा दुरूपयोग. समस्या हाती घेण्याचे कारण --्-- स्वच्छ केलेले शालेय आवार पुन्हा पुन्हा अस्वच्छ होत असे . उडून आलेला कचरा गोळा करण्यात मुलांचा वेळ वाया जाई .माशांचे प्रमाण वाढले होते . त्या माशांचा जेवणाच्या वेळी मुलांना त्रास होइ.

शाळेतील विध्यार्थी , शिक्षक , परिसरातील व्यक्ती.

Step 2 कल्पना करा

१ लोकांना कचरा शाळेच्या आजूबाजूला टाकू न देणे . २ शाळेला कंपाउंड करणे व लोकांना कचराकुंडी उपलब्ध करूनदेणे . ३ कचरा जाळत राहणे .

निवडलेला पर्याय - शाळेला कंपाउंड करणे व लोकांना कचराकुंडी उपलब्ध करून देणे . कारण -- शाळेला कंपाउंड केल्याने शाळेमागील जागेचा गैरवापर थांबेल . लोकांना कचरा कचराकुंडीत टाकतील. शाळेभोवती फेकणार नाहीत .

Step 3करा

मुलांनी समस्या सोडवण्यासाठी प्रथमगटात चर्चा करून कार्यक्रमाची आखणी केली .पालक सभेत समस्या स्पष्ट करत त्यांना श्रमदान व आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले . त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काही गमतीदार उपक्रम घेतले. गृहभेटी देउन परिसरातील महिलांचे प्रबोधन केले . पथनाट्य सादर करत शौचालय वापराविषयीचे महत्त्व स्पष्ट केले . ग्रामपंचायतमधे भेट देउन कचराकुंडी व कंपाउंडसाठी आर्थिक मदत करण्याचे निवेदन दिले परिसरातूनही निधी संकलित केला . निवेदनानंतर ग्रामपंचायतीने कचराकुंड्या दिल्या . जमलेल्या निधीतून व पालकांच्या श्रमदानातून कंपाउंड उभे राहिले.

उपक्रम घेतल्याने पालकांचा कामातील सहभाग वाढला .महिला प्रबोधन केल्याने महिलांना कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी समजली . पथनाट्य सादर केल्याने शौचालय वापराचे महत्व समजले .ग्रामपंचायतीने कचराकुंड्या दिल्याने महिला कचरा नियमितपणे त्यातच टाकू लागल्या. जमलेल्या आर्थिक निधीतून व पालकांनी केलेल्या श्रमदानातून कंपाउंड उभे राहिले.

शाळेतील विद्यार्थी व परिसरातील लोक

महिलांनी कचराकुंडीचा नियमित वापर करण्याचे कबूल केले . पालकांना कंपाउंडचे महत्त्व समजल्याने त्यांनी आर्थिक मदत केली व श्रमदानही केले .

१परिसरातील महिलांचे प्रबोधन करून मतपरिवर्तन करताना . २ पालकांकडून आर्थिक मदत गोळा करताना . ३ कचराकुंडी व कंपाउंडचे साहित्य शाळेपर्यंत वाहून आणण्यात अडचणी आल्या.

7-15 दिवस

चांगले आरोग्य आणि कल्याण

कचरासमस्या सोडवल्याने मुलांचे तसेच परिसरातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली. आजार पसरविणाऱ्या माशांचे प्रमाण कमी झाले. मुलांचा पुन्हा पुन्हा कचरा गोळा करण्यात वाया जाणारा शैक्षणिक वेळ वाचला . मुले अधिकाधिक अध्ययन समृद्ध झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिरंतन व उज्ज्वल भविष्यासाठी मुलांनी सामाजिक व वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठीच्या प्रकीयेची रुपरेषा प्रत्यक्ष अनुभवली . मुलांमध्ये मी हे करु शकतो हा आत्मविश्वास आला .

Step 4 भाग

शाळेत विद्यार्थी व पालकांसोबत तोंडी प्रचार प्रसार .......समाजात हा प्रोजेक्ट यु ट्युब व सोशियल मेडियायाद्वारे शेअर करणार . , मुलांनी प्रयत्न करून सोडवलेली समस्येने शाळा स्वच्छ व सुंदर झाल्याने सर्वांना आनंद झाला .

100 पेक्षा जास्त

परिसरातील लोकांचे कचराकुंडी व शौचालय वापरासाठी वारंवार प्रबोधन करणे . कंपाउंडच्या विविध फुलझाडे व इतर झाडे लावून सुशोभित करणे .